
सनातन संस्था ही अध्यात्मप्रसाराच्या उद्देशाने गेली २७ वर्षे कार्यरत असणारी संस्था आहे. संस्था मुख्यत्वे समाजात अध्यात्मप्रसाराचे आणि वैयक्तिक जीवनात साधना करण्याचे सांगून आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करते. धर्मप्रसाराच्या या कार्यात अनेक जण साधक म्हणून, तर काही जण हितचिंतक, धर्मप्रेमी म्हणून संस्थेच्या कार्यात जोडले जातात. त्यांची प्रत्येकाची त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनात सामाजिक, सांस्कृतिक, तसेच राजकीय भूमिका अगोदरपासून असते. ते ती भूमिका आपल्या विचारांतून, ‘सोशल मिडिया’वरून (सामाजिक माध्यमांतून) मांडत असतात, पण म्हणून त्यांची प्रत्येकाची राजकीय आणि सामाजिक भूमिका ही सनातन संस्थेचीही भूमिका असेलच, असे नाही. त्यामुळे त्यांनी सोशल मिडिया, तसेच भाषणे यांत व्यक्त केलेली मते ही सनातन संस्थेची भूमिका म्हणून मानली जाऊ नये. सनातन संस्थेला जेव्हा एखाद्या विषयावर अधिकृत मत व्यक्त करायचे असते, तेव्हा ते संस्थेच्या प्रवक्त्यांद्वारे मांडले जाते किंवा संस्थेचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध होते किंवा संस्थेच्या अधिकृत ‘सोशल मिडिया अकाऊंट’द्वारे ते मांडले जाते. संस्थेचे अधिकृत प्रवक्ते, प्रसिद्धीपत्रक, सोशल मिडिया अकाऊंट यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणीही मांडलेली व्यक्तीगत मते ही संस्थेची भूमिका आहे, असे मानू नये. त्या मतांशी सनातन संस्था सहमत असेलच, असे नाही.
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था
गुरुपौर्णिमेला २ दिवस शिल्लक
गुरुपौर्णिमेला ३ दिवस शिल्लक
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !
न्यायालय म्हणजे २४ घंटे चालणारी मनोरंजन वाहिनी नव्हे ! – Supreme Court