भारत-पाक सीमेवर अटक करण्यात आलेला अशरफ रिझवान हा या संघटनेशी संबंधित असल्याचे उघड !
जयपूर – मंहमद पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना त्यांच्यावर बलात्कार करून त्यांची हत्या करण्याच्या अनेक धमक्या मिळत आहेत. आता पाकमध्ये त्यांच्या हत्येचा कट शिजत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एस्. सेंगाथीर यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकमधील आतंकवादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक’ने नूपुर शर्मा यांच्या हत्येचा कट रचला आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे भारत-पाक सीमेवर अटक करण्यात आलेला अशरफ रिझवान हाही या संघटनेचा सदस्य आहे.
#Pakistan-based Tehreek-e-Labbaik made plans to kill #NupurSharma, says #RajasthanPolicehttps://t.co/hhN3Ebpiy1
— India TV (@indiatvnews) July 21, 2022
गुप्तचर विभाग, गुन्हे अन्वेषण विभाग, सीमा सुरक्षा दल, भारतीय सैन्य आणि स्थानिक पोलीस यांच्यासह अनेक अन्वेषण यंत्रणा सध्या रिझवानची चौकशी करत आहेत. तो ‘तहरीक-ए-लब्बैक’ या संघटनेच्या संपर्कात असल्याचे उघड झाल्यानंतर अन्वेषण यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. ही तीच संघटना आहे, जिने गेल्या वर्षी पाकमधील तत्कालीन इम्रान खान सरकारला अडचणीत आणले होते आणि अनेक हत्याही केल्या होत्या.
संपादकीय भूमिकाजिहादी आतंकवाद आणि त्याचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट केल्याखेरीज तेथील आतंकवादी संघटना भारतातील हिंदूंच्या हत्यांचे कट रचतच राहील, हे लक्षात घ्या ! |