कोरबा (छत्तीसगड) येथील शिवमंदिरात तोडफोड

श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीरामचरितमानस जाळले  !

(हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

कोरबा (छत्तीसगड) – येथील शिवमंदिराची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. येथील शिवलिंगावरील नाग फेकून देण्यात आला, तर हनुमानाच्या मूर्तीवरील चांदीचे डोळे काढून घेण्यात आले. तसेच येथे ठेवण्यात आलेली श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीरामचरितमानस जाळण्यात आले. येथे मद्याच्या बाटल्याही सापडल्या, तसेच काही जणांनी उलट्या केल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी ३ संशयितांना कह्यात घेतले आहे. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. या घटनेमुळे स्थानिक हिंदूंमध्ये आक्रोश आहे. एक वर्षापूर्वीही येथे तोडफोड करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

  • छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण करण्यात येईल, अशी अपेक्षा या घटनेनंतर तरी करता येऊ शकत नाही !
  • देशात प्रतिदिन कुठेना कुठे हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर आघात करण्याच्या घटना घडत असतात. आता या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा करणारा कायदा केंद्र सरकारने बनवावा, असेच हिंदूंना वाटते !