लोहरदगा (झारखंड) येथील शिवमंदिरात अज्ञातांनी फेकले गोमांस !

मंदिराची स्वच्छता करताना स्थानिक लोक (डावीकडे)

लोहरदगा (झारखंड) – येथील रामपूर गावामधील शिवमंदिरात अज्ञातांकडून गोमांस फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे येथे हिंदु आणि मुसलमान एकमेकांच्या समोर उभे ठाकल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले अन् दोन्ही पक्षांना शांत केले. येथे मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच मंदिराची शुद्धी करण्यात आली आहे. येथील पंचायत सदस्य शंभू सिंह यांनी आरोप केला की, गावामधील शांतता बिघडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारचा उद्दामपणा करून समाजातील शांतता बिघडवणार्‍यांना आणि धार्मिक भावना दुखावणार्‍यांना आता फाशीची शिक्षा देण्याची आवश्यकता आहे !