भारतीय हिंदु नागरिकाची पाकिस्तानी सहकार्‍याकडून सौदी अरेबियामध्ये हत्या

जंग बहादुर यादव

रियाध (सौदी अरेबिया) – उत्तरप्रदेशातील जंग बहादुर यादव नोकरी निमित्त सौदी अरेबियाला गेले असता तेथे त्यांच्या पाकिस्तानी सहकार्‍याने त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही हत्या का आणि कशी करण्यात आली, याची विस्तृत माहिती मिळू शकलेली नाही. वर्ष २०१७ मध्ये जंग बहादुर सौदी अरेबियामध्ये गेले होते. तेथे टॅक्सीचालक म्हणून ते काम करत होते. जंग बहादुर यांच्या हत्येच्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी भारत सरकारकडे त्यांचे शव भारतात आणण्यासाठी साहाय्य करण्यासह आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे.