उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नगर, नाशिक येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !

मागील भागात संभाजीनगर, जालना, नंदुरबार, धुळे येथे मिळालेला प्रतिसाद पाहिला. आता या भागात नांदेड येथे मिळालेला उत्तम प्रतिसाद वाचणार आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/593437.html

५. नांदेड

५ अ. ‘मुलांवर संस्कार होऊन त्यांना वाचनाची ओढ लागावी’, यांसाठी ग्रंथ घेणारे श्री. शेखर गादेवार ! : ‘सनातन प्रभात’चे वाचक, अर्पणदाते आणि हितचिंतक श्री. शेखर गादेवार यांनी ग्रंथांची मागणी दिली. त्यांनी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने समाजातील महिलांना भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लघु आणि मोठे ग्रंथ मागितले. त्यांनी अशी कल्पना मांडली, ‘‘आपण विद्यार्थ्यांसाठीचे ग्रंथ विद्यार्थ्यांना देऊ. त्यांना त्याचा अभ्यास करायला सांगून त्यातील ३ ग्रंथांवर आधारित परीक्षा घेऊ आणि पारितोषिक म्हणून पुन्हा वेगळे ग्रंथ देऊ. त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होतील आणि त्यांना वाचनाची ओढ लागेल.’’ त्यांनी इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रत्येक संचातील विविध ग्रंथ घेतले. मागणीनंतर त्यांनी सर्व रक्कम १० दिवसांत जमा केली.

सद्गुरु नंदकुमार जाधव

५ आ. आधुनिक वैद्यांचा मिळालेला प्रतिसाद !

५ आ १. ‘राष्ट्रविषयक ग्रंथ चांगल्या युवकांपर्यंत पोचले पाहिजेत’, असे सांगून ग्रंथ प्रायोजित करणारे नांदेड येथील आधुनिक वैद्य मृत्युंजय महिंद्रकर ! : नांदेड येथील विज्ञापनदाते आधुनिक वैद्य मृत्युंजय महिंद्रकर यांना ‘ज्ञानशक्ती अभियान’ आणि ‘हलाल जिहाद’ यांविषयी सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘याविषयी युवकांना जागृत केले पाहिजे. राष्ट्रविषयक ग्रंथ चांगल्या युवकांपर्यंत पोचले पाहिजेत.’’ त्यांनी काही ग्रंथ प्रायोजित केले आणि काही मोठे ग्रंथ घेतले. ‘त्यांना स्वरक्षण प्रशिक्षण विषयात आवड आहे’, हे आमच्या लक्षात आले. त्याविषयी त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘स्वरक्षण उपक्रम वाढवण्यासाठी मी साहाय्य करतो; पण युवकांना सिद्ध केले पाहिजे. युवकांना प्रशिक्षणासाठी साहित्य द्या. त्यासाठी मी स्वतः साहाय्य करीन.’’

५ आ २. एका आधुनिक वैद्यांनी त्यांच्या चिकित्सालयात ठेवण्यासाठी ग्रंथांची मागणी देणे : एका आधुनिक वैद्यांना सनातनचे कार्य सांगून ग्रंथ दाखवले. त्यांनी रुग्णांना वाचण्यासाठी मोठे ग्रंथ घेतले. ते म्हणाले, ‘‘रुग्ण रुग्णालयात स्वतःचा क्रमांक येण्याची वाट पहात बसतात, तेथे त्यांना वाचण्यासाठी हे ग्रंथ ठेवू.’’ त्यांनी आम्हाला संपर्क करण्यासाठी एका शिक्षण संस्थाचालकांचे नावही सुचवले.

५ इ. शालेय आणि महाविद्यालयीन संपर्कात मिळालेला वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद !

५ इ १. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सुंदर महान कार्य आरंभले असून त्यांना भेटायचे आहे’, असे सांगणारे नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे विश्वस्त श्री. बाळासाहेब पांडे (वय ७८ वर्षे) ! : नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे विश्वस्त श्री. बाळासाहेब पांडे यांचे सनातन संस्थेविषयी काही अपसमज होते. श्री. पांडे यांना सनातन संस्थेच्या कार्याविषयी सांगितल्यावर त्यांना संस्थेविषयी आदर वाटला. ते म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले कुठे असतात ? त्यांनी एवढे महान कार्य आरंभले आहे. मला त्यांना भेटायचे आहे.’’ त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसाठी काही ग्रंथ घेतले. त्यांनी महाविद्यालयातील प्राचार्य आणि ग्रंथपाल यांना बैठकीसाठी बोलावून त्यांना सांगितले, ‘‘साधक जे ग्रंथ सांगत आहेत, तेवढे सर्व घ्या. ग्रंथांची किंमत कितीही होऊ दे.’’ त्यांनीही मोठ्या प्रमाणात ग्रंथांची मागणी दिली आणि संपर्कासाठी आम्हाला आणखी ६ महाविद्यालयांची नावे सांगितली.

५ ई. व्यापाऱ्यांचा मिळालेला उत्तम प्रतिसाद !

५ ई १. ‘एवढे सर्व विविध विषयांचे ग्रंथ अनेक भाषांमध्ये एकच व्यक्ती कसे लिहू शकते ?’, असे म्हणून ‘सर्व ग्रंथ छान आणि महत्त्वपूर्ण आहेत’, असे सांगणारे व्यापारी ! : येथील एका मोठ्या व्यापाऱ्यांना भेटल्यावर त्यांनी हातातील काम बाजूला ठेवले. ग्रंथसूची पहातांना ते त्यावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे आकृष्ट झाले. ग्रंथ पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘एवढे सर्व विविध विषयांवरील ग्रंथ अनेक भाषांमध्ये एकच व्यक्ती कसे लिहू शकते ? सर्व ग्रंथ छान आणि महत्त्वपूर्ण आहेत. ग्रंथांची मागणी नंतर सांगतो.’ त्यांनी हे ग्रंथ विविध मंदिरांत ठेवण्यासाठी आम्हाला आश्वस्त केले.

५ ई २. ‘तुमचे कार्य पुष्कळ महान असून समाजाला याची आवश्यकता आहे’, असे सांगणारे मोठे व्यापारी श्री. भंडारी ! : येथील मोठे व्यापारी श्री. भंडारी यांना भेटल्यावर त्यांना ‘हलाल जिहाद’, ‘मंदिरांवर होणारे आघात’ आणि ‘ज्ञानशक्ती अभियान’ यांविषयी माहिती सांगितली. ते म्हणाले, ‘‘तुमचे कार्य पुष्कळ महान आहे. समाजाला याची आवश्यकता आहे. आम्ही मागणीविषयी त्यांना काही विचारण्याआधीच त्यांनी त्यांच्या मंदिरासाठी ग्रंथांची मागणी दिली. त्यांनी ‘आणखी कोणते व्यापारी आर्थिक स्वरूपात सहकार्य करू शकतात ?’, त्यांचीही नावे आम्हाला सांगितली.

५ ई ३. ‘कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त आपत्काळाचे ग्रंथ भेट देतो’, असे सांगून ग्रंथ घेणारे प्रतिष्ठित व्यापारी श्री. संदीप रामीनवार ! : येथील प्रतिष्ठित व्यापारी श्री. संदीप रामीनवार हे नियमित साधनावृद्धी सत्संगाला उपस्थित असतात. ते साधनाही करतात. त्यांची दोन उपाहारगृहे (हॉटेल), विश्रामालय (लॉजिंग) आणि एक चित्रपटगृह आहे. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ते दिवाळीनिमित्त मिठाई देतात. त्या समवेत त्यांनी ‘आपत्काळात करावयाची सिद्धता’ आणि ‘मानसिक अन् आध्यात्मिक स्तरावर करायची सिद्धता’, अशा दोन ग्रंथांची मागणी केली. त्यांनी त्यांच्या मंदिरासाठीही ग्रंथांची मागणी केली. यापूर्वी श्री. रामीनवार यांच्या सासऱ्यांचे निधन झाले होते, तेव्हा त्यांनी ‘सनातनच्या ग्रंथांचा प्रसार व्हावा’, यांसाठी काही ग्रंथ घेऊन त्यांनी ते त्यांच्या नातेवाइकांना दिले आणि त्यांना ‘अभिप्राय कळवा’, असेही सांगितले. त्यांनी संक्रांतीच्या निमित्ताने वाणासाठी ५० लघुग्रंथ आणि ५० मोठ्या ग्रंथांची मागणी केली.

५ ई ४. ‘सनातनचे ग्रंथ हा माझा आवडीचा विषय आहे’, असे सांगणारे नगरसेवक आणि महानगरपालिकेचे सभापती अधिवक्ता महेश कनकदंडे ! : येथील काँग्रेसचे नगरसेवक आणि महानगरपालिकेचे सभापती अधिवक्ता महेश कनकदंडे यांच्याशी संपर्क झाला. तेव्हा त्यांचे पहिलेच वाक्य होते, ‘‘सनातनचे ग्रंथ हा माझा आवडीचा विषय आहे. ‘श्री गणेश अथर्वशीर्ष’ हा लघुग्रंथ समाजातील प्रत्येक घरात असला पाहिजे; कारण त्यात श्लोकांचा अर्थ पुष्कळ चांगल्या प्रकारे दिला आहे.’’

(क्रमशः)

– सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था. (२९.१.२०२२)