ईदच्या वेळी होणार्‍या हत्यांवर बंदी घाला ! – नेदरलँडचे खासदार गीर्ट विल्डर्स

नवी देहली – ईदच्या वेळी होणार्‍या हत्यांवर बंदी घाला, असे ट्वीट नेदरलँडच्या ‘पार्टी ऑफ फ्रिडम’ पक्षाचे खासदार आणि अध्यक्ष गीर्ट विल्डर्स यांनी केले.

कुराण आणि महंमद पैगंबर यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्याची इच्छा गीर्ट विल्डर्स यांनी व्यक्त केली. भेदभाव, हिंसा आणि असहिष्णुता हे मुसलमानांच्या विचारधारेचे मूळ आहे. ही विचारसरणी दूर केली तर समाज अधिक मुक्त, नीतीमान आणि सुरक्षित होईल, असे गीर्ट यांनी म्हटले आहे.