रंगली आज पंढरी ।

श्री. सुधाकर जोशी

नामाचा गजर जाहला आज ।
गुलाल-बुक्क्याने पंढरी रंगली ।
आली आषाढी एकादशी ।। धृ.।।

नामामध्ये रंग भरला ।
वारकऱ्यांना हर्ष जाहला ।
चंद्रभागेतिरी जमली संतमंडळी ।
आली आषाढी एकादशी ।। १ ।।

आळंदीचा राणा पंढरीसी आला ।
पालखी पाहून हर्ष होतो मना ।
एकमेकां गळाभेट देती ।
आली आषाढी एकादशी ।। २ ।।

ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालखीचा ।
मेळा होतो वाखरीत ।
रिंगण होते मोठे । पहाण्यास गर्दी होते मोठी ।
स्वर्गीय आनंद होतो मनी । आली आषाढी एकादशी ।। ३ ।।

– श्री. सुधाकर के. जोशी (वय ९२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०२०)