सनातन संस्थेकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचे महत्त्व सांगितल्यावर हिंदूंच्या स्थितीविषयी नकारात्मक झालेल्या हिंदु व्यक्तीचे मतपरिवर्तन होणे

अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे शेजार्‍यांकडून गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण मिळवण्यासाठी गेल्यावर हिंदूंच्या स्थितीविषयी नकारात्मक मत असलेली एक व्यक्ती भेटणे

माझ्या मनात परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे विचार आला, ‘आपल्या वसाहतीतील सर्वांकडून गुरुपौर्णिमेसाठी अर्पण मिळवण्याकरता जावे.’ त्याप्रमाणे मी ९ लोकांना भेटले. त्या सर्वांनी मला अर्पण दिले. त्यांच्यापैकी एक व्यक्ती हिंदूंच्या दयनीय स्थितीविषयी पुष्कळच नकारात्मक होती. त्यांनी मला सांगितले, ‘येणार्‍या २०-३० वर्षांत हिंदू शेषच रहाणार नाहीत.’

२. सनातन संस्थेकडून धर्माविषयी मार्गदर्शन मिळाल्यामुळे साधिकेचे अज्ञान दूर झाल्याचे तिने नकारात्मक स्थितीतील हिंदु व्यक्तीला सांगितल्यावर ती सकारात्मक होणे

मी त्या हिंदूला सनातन संस्थेचे कार्य सांगितले. गुरुदेवांच्या कृपेमुळे मी त्यांना सांगितले, ‘‘आपल्याला सकारात्मक राहून प्रयत्न करावे लागतील. जेव्हा आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो, तेव्हा ईश्वर निश्चितच साहाय्य करतो.’’ मी त्यांना स्वतःचे उदाहरण दिले, ‘मी लहानपणी मंदिरात जात नव्हते. मला भगवंताचा राग येत होता; कारण तो कुणाला पुष्कळ सुखी ठेवतो, तर कुणाला भीक मागायला लावतो. त्या वेळी मला प्रारब्ध आणि मागील जन्मांच्या कर्मांविषयी काहीच ज्ञात नव्हते. माझ्या आई-वडिलांनीही मला त्याविषयी कधीच सांगितले नव्हते; परंतु सनातन संस्थेकडून मला हे सर्व मार्गदर्शन मिळाले आणि माझे अज्ञान दूर झाले.’ मी त्यांना म्हटले, ‘धर्मरक्षणाचे कार्य तर आपल्या घरापासूनच चालू करायला पाहिजे.’ हे ऐकून ते गृहस्थ पुष्कळ सकारात्मक झाले आणि त्यांनी सनातन संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.

गुरुदेवांनी एका नकारात्मक विचार करणार्‍या हिंदु व्यक्तीचे मन सकारात्मक केले. त्यासाठी गुरुदेवांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते.

– (अधिवक्त्या) सौ. अमिता सचदेवा, मालवीयनगर, नवी देहली. (१८.७.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक