‘अलिबाग (रायगड) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गिरीश जोशी यांची साधिकेच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. नामजपाची आवड
‘श्री. गिरीश जोशी यांना साधनेविषयी समजल्यापासून ते पहाटे उठून नियमित नामजप करतात. ते कामानिमित्त प्रवासात असल्यास प्रवासातही नामजप करतात.
२. ते नियमित धोतर नेसून देवपूजा करतात.
३. धर्माभिमानी
एकदा श्री. जोशी यांच्या संगणकीय प्रशिक्षण संस्थेतील एका विद्यार्थ्याने गळ्यात ‘क्रॉस’ घातला होता. त्या वेळी श्री. जोशी यांनी त्या विद्यार्थ्याचे प्रबोधन करून त्याला गळ्यातील ‘क्रॉस’ काढायला लावला.
४. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा प्रसार करणे
अ. ‘श्री. गिरीश जोशी दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. त्यांची एक संगणक प्रशिक्षण संस्था (‘कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट’) होती. तेव्हा ते त्यांच्याकडे येणार्या विद्यार्थ्यांना साधना सांगत असत, तसेच ते विद्यार्थ्यांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मध्ये येणारे लेख वाचायला सांगत असत. त्यांच्याकडे येणार्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू केले होते.
आ. ते एका पतपेढीचे विश्वस्त आहेत. तेथेही त्यांनी पतपेढीतील कर्मचार्यांसाठी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू केले आहे.
५. संगणक प्रशिक्षण संस्था बंद झाल्यावर ‘देव पूर्णवेळ साधना करण्याची सिद्धता करून घेत आहे’, असे वाटणे
एकदा त्यांना एका संतांचा सत्संग लाभला. त्या वेळी त्या संतांनी त्यांना ‘समष्टी सेवेसाठी वेळ द्या’, असे सांगितले. त्या संतांनी श्री. जोशी यांना सत्संग घेण्याचीही सेवा करण्यास सांगितले. त्यांना संतांचा सत्संग मिळण्याच्या आधी काही दिवसांपासून त्यांच्या मनात ‘पूर्णवेळ साधना करावी’, असा विचार आला होता; परंतु व्यावहारिक दायित्व असल्यामुळे त्यांना त्या वेळी निर्णय घेणे शक्य नव्हते. त्यांची संगणक प्रशिक्षण संस्था बंद झाली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘देव माझी पूर्णवेळ साधना करण्याची सिद्धता करून घेत आहे.’’
६. समष्टी सेवेतील सहभाग
ते गुरुपौर्णिमेच्या वेळी अर्पण मिळवणे, सनातन पंचांगांचे वितरण करणे, नातेवाइकांच्या मुलांना सनातन वही भेट देणे आणि संपर्कातील व्यक्तींना साधना सांगून त्यांचे राष्ट्र अन् धर्म यांविषयी प्रबोधन करणे, अशा सेवा करतात.
– सौ. विशाखा आठवले, अलिबाग, रायगड. (३०.६.२०२६)
उतारवयातही स्वावलंबी, कार्यरत आणि आनंदी असलेले अलिबाग (रायगड) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गणेश महादेव आठवले (वय ९१ वर्षे) !
पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९४ वर्षे) यांच्या मागील जन्मांतील, तसेच या जन्मातील साधनाप्रवासाच्या संदर्भात सूक्ष्म-ज्ञानातून गवसलेले ज्ञानमोती !
शांत, समाधानी आणि अखंड नामानुसंधानात असणार्या बडोदा (गुजरात) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शालिनी फाटक (वय ९१ वर्षे) !
नामजपादी उपायांचे महत्त्व आणि आश्रमात रहाण्याचे लाभ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
गुरुस्तवन भावांजली : साधकांना गुरुकृपायोगरूपी तारक मंत्र प्रदान करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !