परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभावात रहाणारा चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथील ५२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला कु. योगेश्वर ओंकार जरळी (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. योगेश्वर ओंकार जरळी हा या पिढीतील एक आहे !

कु. योगेश्वर ओंकार जरळी

२२.७.२०२१ या दिवशी चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथे मोठा पूर आला होता. पुराचे पाणी आमच्या घराजवळ आले होते. त्या आपत्कालीन परिस्थितीतही कु. योगेश्वर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभावात होता. तो परिस्थिती स्वीकारून सकारात्मक राहिला आणि त्याने इतरांनाही सकारात्मक रहाण्यास साहाय्य केले. तेव्हा माझ्या लक्षात आलेली त्याची सकारात्मकता आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असलेला त्याचा कृतज्ञताभाव येथे दिला आहे.

आधुनिक वैद्या (सौ.) साधना जरळी

१. कु. योगेश्वरची जाणवलेली सकारात्मकता !

अ. ‘कु. योगेश्वर म्हणाला, ‘‘संतांनी सांगितले आहे, ‘हा धरणीमातेच्या शुद्धीचा काळ आहे.’ त्यामध्ये चिपळूणची शुद्धी होत आहे.’’

आ. सकाळी ६.३० वाजता योगेश्वर झोपेत असतांना मी त्याला म्हणाले, ‘‘लवकर ऊठ. आपल्या घराजवळ पुराचे पाणी आले आहे. आपल्याला लगेच घरातून बाहेर पडायचे आहे.’’ त्याला असे सांगितल्यावर तो लगेच उठला. त्याने ५ मिनिटांत स्वतःची पिशवी भरली आणि तो घराबाहेर पडायला सिद्ध झाला.

इ. या आपत्कालीन परिस्थितीतही तो स्थिर होता. तो नातेवाइकांनाही समजावून सांगत होता.

२. कु. योगेश्वरचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेला कृतज्ञताभाव !

२ अ. आपत्काळात मिळत असलेल्या साहाय्याविषयी कृतज्ञताभाव असणे : तो आम्हाला म्हणाला, ‘‘या आपत्काळात आपल्याला सर्व साधक आणि समाजातील ओळखीचे लोक साहाय्य करत आहेत’, ही परात्पर गुरु डॉक्टरांची आपल्यावर असलेली कृपाच आहे.’’

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने स्वतः आणि आई-वडील यांचा जीव वाचल्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटणे : आमच्या घरातील पुष्कळ साहित्य पुराच्या पाण्याने खराब झाले आणि काही साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यामुळे त्याच्या आजीला (सौ. उज्ज्वला जरळी (वडिलांची आई (वय ६२ वर्षे) यांना) वाईट वाटले. तेव्हा तो आजीला म्हणाला, ‘‘साहित्य खराब झाले, वाहून गेले किंवा हानी झाली, यापेक्षा ‘आमचा (मी आणि आई (सौ. साधना जरळी) आणि वडील (श्री. ओंकार जरळी)) यांचा जीव वाचला. देवाने आम्हा तिघांना सुरक्षित ठेवले’, ही गुरुदेवांची आपल्यावर पुष्कळ मोठी कृपा आहे आणि हेच आपल्यासाठी पुष्कळ आहे.’’

या सर्व परिस्थितीत योगेश्वर संपूर्ण सकारात्मक अन् देवाच्या अनुसंधानात होता. कुठेही प्रतिक्रिया, चिडचिड, हट्ट, दुःख, रडणे किंवा घाबरणे, असे त्याच्याकडून झाले नाही. या परिस्थितीत ‘स्वीकारणे, ऐकणे, दुसऱ्याचा विचार करणे आणि ईश्वरेच्छेने वागणे’, हे योगेश्वरचे गुण माझ्या लक्षात आले. यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !

– आधुनिक वैद्या (सौ.) साधना जरळी (आई), चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (७.८.२०२१)