बांगलादेशात मुसलमान विद्यार्थ्याकडून हिंदु शिक्षकाची हत्या

उत्पल कुमार सरकार

ढाका (बांगलादेश) – येथील हाजी युनूस अली स्कूल अँड कॉलेज येथे शिक्षक असणार्‍या उत्पल कुमार सरकार यांना १९ वर्षीय अशराफुल इस्लाम या तरुणाने क्रिकेटच्या यष्टीद्वारे मारहाण करून त्यांची हत्या केली. ही घटना २५ जून या दिवशी घडली. इस्लाम हा याच शाळेत इयत्ता १० वी मध्ये शिकतो. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संपादकीय भूमिका

याविषयी भारत सरकार गप्प का ? इस्लामी देश आणि त्यांची संघटनाही गप्प का ? अशी घटना भारतात एखाद्या हिंदूकडून मुसलमानाच्या संदर्भात घडली असती, तर संपूर्ण जगात तिचे भारताच्या आणि हिंदूंच्या विरोधात पडसाद उमटले असते !