भरतपूर (राजस्थान) – राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील भौसींगा गावात संजय नावाच्या एका बलात्कार्याला पकडण्यास गेलेले हवालदार हरगोपाल यांच्यावर आरोपीने चाकूद्वारे आक्रमण केले. यात हरगोपाल गंभीर घायाळ झाले. संजयच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी फरार आहे. हरगोपाल यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. पोलीस अधीक्षक, तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकास्वत:चे रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? |