तरुणांनो, उठा आणि देशसेवेसाठी सिद्ध व्हा !

सुसंस्कारित आणि सक्षम युवक हेच देशाचे धन !

वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील

तरुणांनो उठा, जागे व्हा आणि देशसेवेसाठी सिद्ध व्हा ।।
भारतभूमीमध्ये जन्म मिळाल्याचा बाळगा अभिमान ।। १ ।।

भारतभूमी आहे संतांची ।।
यामध्ये नाही न्यूनता कशाची ।। २ ।।

भारतामध्ये आहे साठा चैतन्याचा ।।
चैतन्यामध्ये नसे उणीव कशाची ।। ३ ।।

विदेशात चाकरी करण्यापेक्षा देशाची करा सेवा ।
स्वदेशाला महासत्ता बनवण्याचे ध्येय ठेवा ।। ४ ।।

मी, माझे नको, तर देश महासत्ता होणे हे प्राधान्य ।।
देशासाठी तन, मन, धन अर्पून व्हा धन्य ।। ५ ।।

छोट्याशा संकटाला नका घाबरू ।।
क्रांतीकारकांचा आदर्श समोर ठेवून मार्गक्रमण करू ।। ६ ।।

देशसेवेचे व्रत न जाई व्यर्थ ।।
तरुणांनो, उठा जागे व्हा आणि करा जीवन सार्थ ।। ७ ।।

– वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील, पनवेल. (१६.६.२०२२)