काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या अतिक्रमण प्रकरणी लढा देणारे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा गोमंतकातील श्री मंगेश देवस्थानासह अन्य प्रमुख मंदिरांकडून सत्कार !

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील संस्मरणीय क्षण !

श्री मंगेश देवाची प्रतिमा देऊन अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा सत्कार करतांना श्री मंगेशी देवस्थानचे सचिव श्री. अरुण नाडकर्णी

रामनाथी, १२ जून (वार्ता.) – काशी विश्‍वनाथ मंदिर अतिक्रमणमुक्त होण्यासाठी ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात यशस्वी न्यायालयीन लढा देत असल्याप्रकरणी गोमंतकातील विविध देवस्थानांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र हिंदू फ्रंट फॉर जस्टिसचे प्रवक्ते तथा सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात १२ जून या प्रथम दिवशी विशेष सत्कार करण्यात आला. यात श्री मंगेशी देवस्थानचे अध्यक्ष डॉ. अजय कंटक आणि सचिव श्री. अरुण नाडकर्णी, श्री कमळेश्‍वर मंदिराचे अध्यक्ष श्री. गुरुनाथ प्रभु आणि सचिव श्री. कृष्ण गावडे, श्री दामोदर देवस्थानचे श्री. जयेश कामत-बांबोळकर, श्री मुरुगन देवस्थानचे अध्यक्ष श्री. मारुती अय्यर आणि गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत (भाई) पंडित अन् सचिव श्री. जयेश थळी यांनी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा पुष्पहार घालून, तसेच शाल, श्रीफळ आणि देवतांची प्रतिमा देऊन विशेष सत्कार केला. या प्रसंगी उपस्थित अन्य धर्माभिमानीही भारावून गेले. विविध देवतांचा जयघोष करून धर्माभिमान्यांनीही जैन पिता-पुत्रांचा गौरव केला.

पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांचा सत्कार करतांना श्री मुरुगन देवस्थानचे अध्यक्ष श्री. मारुती अय्यर

या प्रसंगी मंगेशी देवस्थानाचे डॉ. अजय कंटक म्हणाले, काशी येथील विश्‍वनाथ मंदिरात पूजेचा पहिला मान श्री मंगेश देवस्थानच्या महाजनांचा आहे. प्रत्येक वर्षी काशी येथील श्री विश्‍वनाथ मंदिरातून गंगाजल श्री मंगेशी येथे पाठवण्यात येते. आम्ही त्या जलाद्वारे गोवा येथील श्री मंगेश देवस्थानच्या गर्भगृहाची शुद्धी करतो. मी स्वत: गेल्या अनेक वर्षांपासून न चुकता काशी येथे दर्शनासाठी जातो.

गोमंतकातील प्रमुख मंदिरांच्या पदाधिकार्यांसह पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांचा सन्मान करतांना गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत (भाई) पंडित आणि त्यांच्यामागे सचिव श्री. जयेश थळी
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांचा सत्कार करतांना जांबावली येथील श्री रामनाथ दामोदर देवस्थानचे खजिनदार श्री. जयेश कामत-बांबोळकर
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांचा सत्कार करतांना कोरगाव, पेडणे येथील श्री कमलेश्‍वर देवस्थानचे अध्यक्ष श्री. गुरुनाथ प्रभु
अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा सत्कार करतांना मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी
अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा सत्कार करतांना कोरगाव, पेडणे येथील कमलेश्‍वर देवस्थानचे सचिव श्री. कृष्णा गावडे
‘ज्ञानवापी’ मुक्तीसाठी लढा देणारे अधिवक्ता हरि शंकर जैन यांचा श्री मंगेश देवाची प्रतिमा देऊन सत्कार करतांना श्री मंगेश देवस्थानचे अध्यक्ष डॉ. अजय कंटक (डावीकडे), सोबत अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि अन्य मान्यवर