कतारकडून जगभरातील इस्लामी आतंकवाद्यांना अर्थपुरवठा ! -‘पॉलिसी रिसर्च ग्रुप’च्या अहवालातील माहिती

नवी देहली – जगभरात इस्लामी आतंकवाद पसरवण्यासाठी कतार देशातून अर्थपुरवठा केला जातो, अशी माहिती ‘पॉलिसी रिसर्च ग्रुप’च्या अहवालातून देण्यात आली आहे.

१. या अहवालात म्हटले आहे की, जागतिक आतंकवादाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कतारकडून अनेक देशांतील मुसलमानांना शिक्षण आणि रोजगार देण्याच्या नावाखाली मशिदी अन् मदरसे बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये दिले जात आहेत. भारतातील केरळमध्येही मशिदींना असा अर्थपुरवठा करण्यात आला आहे.

२. थेट कतारकडून अर्थसाहाय्य घेणार्‍यांमध्ये अल्-कायदा, इस्लामिक स्टेट आदी आतंकवादी संघटना, तसेच त्यांच्याशी संबंधित लहान संघटना यांचाही समावेश आहे. या सर्वांना आस्थापनांच्या माध्यमांतून पैसे पुरवले जातात.

संपादकीय भूमिका

अशा देशांवर जगाने बहिष्कार घातला पाहिजे. यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा !