हिंदु महिलेचे धर्मांतर करणार्‍या मुसलमानाकडून पोलिसांवर गोळीबार

पोलिसांच्या प्रत्युत्तरात आरोपी घायाळ

आरोपी महंमद सलमान

कन्नौज (उत्तरप्रदेश) – विवाहित हिंदु महिलेचे धर्मांतर करून तिच्या २ मुलींचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या महंमद सलमान याला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर  सलमान याने गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात सलमान घायाळ झाला. त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या महिलेच्या पतीने सलमान याच्या विरोधात तक्रार केल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.

संपादकीय भूमिका

आतापर्यंत जिहादी आतंकवादी, कसाई, गुंड हेच पोलिसांवर गोळीबार करत होते, आता धर्मांतर करणारे मुसलमानही पोलिसांवर गोळीबार करू लागले आहेत, हे पोलिसांना लज्जास्पद !