
उन्नाव (उत्तरप्रदेश) – येथे साधू राममिलन दास उपाख्य बाबा मिलन दास सिंह यांची हत्या करणारा इस्रायल हा पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायल आणि त्याचे सहकारी हे ताजपूर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय सूत्रांच्या आधारे मिळाली. त्यानुसार पोलिसांनी १५ जूनच्या पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास या संपूर्ण परिसराला वेढा घातला. आपण कोंडीत सापडल्याचे कळताच इस्रायलने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत तो ठार झाला.
ध्वनीक्षेपकावरून भजन-कीर्तन करत असल्याने साधू राममिलन यांची हत्या !
इस्रायलने ९ जूनला त्याच्या साथीदारांसह उन्नावमधील बांगरमऊ परिसरात साधू राममिलन दास यांची चाकूने वार करून हत्या केली होती. साधू दास यांच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, साधू मंदिरात भजन-कीर्तनासाठी ध्वनीक्षेपकाचा वापर करत असल्याचे काही कट्टरतावाद्यांना आवडत नव्हते आणि त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. साधूंच्या हत्येनंतर आरोपी पसार झाले. या घटनेनंतर कुटुंबियांनी न्यायाची मागणी चालूच ठेवली. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी एक लाख रुपयांचे पारितोषिकही घोषित केले होते. आता उर्वरित आरोपींवरही कठोर कारवाई करवी, अशी मागणी साधू राममिलन दास यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केली आहे.
FSSAI Notice : अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी दिशाभूल करणारे दावे : ८ आस्थापनांना नोटिसा
बाबर, अकबर, हुमायून आदी आक्रमकांचे संग्रहालय बांधून त्याद्वारे त्यांची क्रूरता दाखवा ! : Sangeet Singh Som
Ayush Malik Conversion : पसार आरोपी तौफिकला अटक
केरळम् : मदरसा शिक्षकाशी लग्न ठरल्याने अप्रसन्न झालेल्या १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या
US-Based Christian Missionary : ख्रिस्ती मिशनरी संस्था आणि ७ व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद
TMC Split : तृणमूल काँग्रेसच्या २० लोकसभा खासदारांचा ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’मध्ये विलीनीकरणाचा निर्णय !