अकोला येथे देवस्थान भूमी संरक्षण परिषद !

अकोला – सरकारने ‘देवस्थान इनाम निर्मूलन कायद्या’चे प्रारूप स्थगित करणे हा हिंदूंच्या संघटित शक्तीचा मोठा विजय असून पुढील लढा मंदिरांच्या भूमी वक्फ बोर्डाच्या कह्यातून मुक्त करण्याचा असेल आणि मंदिर भूमी बळकावणार्यांच्या विरोधात ‘अँटी-लँड ग्रॅबिंग’ (भूमी अधिग्रहण) कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार, असा निर्धार येथे आयोजित केलेल्या ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषदे’त व्यक्त करण्यात आला. या परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, तसेच राष्ट्रीय मंदिर महासंघाचे संघटक श्री. सुनील घनवट यांच्यासह अकोला अन् विदर्भातील विविध मंदिरांचे १५० विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी श्री. सुनील घनवट यांनी सांगितले, ‘‘मंदिर विश्वस्तांनी संघटित झाल्यास देशातील ४ लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होतील.’’ हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी परिषदेची प्रास्ताविक भूमिका मांडली. त्यांनी महाराष्ट्र मंदिर महासंघाने आतापर्यंत केलेले कार्य आणि मिळालेले ऐतिहासिक यश यांचा आढावा घेतला.
या प्रसंगी व्यासपिठावर श्री चंडिकादेवी संस्थानचे अध्यक्ष श्री. प्रशांत देशमुख, स्वयंभू महादेव अंत्रीचे अध्यक्ष श्री. अरविंद देठे, हनुमान मंदिराचे विश्वस्त श्री. प्रमोद अग्निहोत्री, मूर्तीजापूर मंदिर महासंघाचे विश्वस्त दिनकर ठाकरे आदी उपस्थित होते.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा