उप्पळा (केरळम्) येथील कोंडेवूर मठाचे मठाधीश्वर श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

रामनाथी (गोवा) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा महासंकल्प केला आहे. त्यानुसार लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. यासाठी आपण सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करायला हवेत. या कार्याला दैवी अधिष्ठन लाभून त्यासाठी सर्वांना बळ मिळो, असे आशीर्वचनपर मार्गदर्शन श्री कोंडेवूर मठ, उप्पळा, कासारगोड, केरळम् येथील मठाधीश्वर श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी यांनी साधकांना केले. स्वामीजींनी १३ जून या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्या प्रसंगी ते बोलत होते.

या वेळी स्वामीजींचे भक्त आणि म्हापसा येथील उद्योजक श्री. परेश रायकर अन् श्री. श्यामराव रायकर हे उपस्थित होते. ‘सनातन प्रभात’चे उपसंपादक श्री. उमेश नाईक यांनी श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी यांचा पुष्पहार घालून आणि शाल अन् श्रीफळ देऊन सन्मान केला. स्वामीजींना सनातनचे ग्रंथ भेट देण्यात आले. साधक श्री. योगेश गंद्रे यांनी आश्रमात चालू असलेल्या राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची त्यांना ओळख करून दिली.
अभिप्राय व्यक्त करतांना स्वामीजी म्हणाले, ‘‘आश्रमात दैवी, चैतन्यदायी अनुभूती आली. आश्रमात सर्वत्र सकारात्मक स्पंदने जाणवली. आश्रमातील वातावरण शांत आणि स्वच्छ आहे.’’
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई