
पुणे – अन्न व औषध प्रशासन विभागाने स्वारगेट परिसरातील दुकानांवर धडक कारवाई केली. अन्नपदार्थांमधील भेसळी व्यतिरिक्त तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, पानमसाला अशा प्रतिबंधित पदार्थांवरही कारवाई केली. आरोपींवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने परिसरातील अनेक दुकानांमध्ये पहाणी केली. खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये स्वच्छता आणि इतर नियम पाळले जात नाहीत, तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पथकाने दिला. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ करणार्यांनाही अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईची चेतावणी दिली आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !