
नांदेड – जिल्ह्यातील नायगाव उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन (पोस्टमार्टम) विभागात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे एका मृतदेहाचे शवविच्छेदन रुग्णवाहिकेच्या प्रकाशात केले. ११ जूनच्या रात्रीच्या सुमारास पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा पूर्ण केल्यानंतर शवविच्छेदन चालू केले; मात्र त्याच वेळी शवविच्छेदन विभागातील मुख्य वीजवाहिनी जळाल्यामुळे वीज गेली. त्यामुळे आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांनी रुग्णवाहिकेच्या प्रकाशात ही प्रक्रिया पूर्ण केली.
रुग्णालयात ‘एक्सप्रेस फीडर’ आणि विद्युत् जनित्र यांची सुविधा असतांनाही हा प्रकार घडल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन पेरके यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. (‘एक्सप्रेस फीडर’ म्हणजे मुख्य वीज उपकेंद्रातून थेट एखाद्या महत्त्वाच्या इमारतीला किंवा संस्थेला दिलेली स्वतंत्र वीज वाहिनी. या वाहिनीवरून इतर कोणत्याही सामान्य ग्राहकाला किंवा गावाला वीजपुरवठा केला जात नाही.) ही समिती मुख्य वायर जळण्याच्या कारणाची पडताळणी करील, तसेच नियमांनुसार संध्याकाळच्या वेळी शवविच्छेदन करणे योग्य होते कि नाही याचेही अन्वेषण करील. चौकशीत हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील अशा लाजिरवाण्या त्रुटींवरून ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर