‘लँड (भूमी) जिहाद’चे संकट : हिंदूंनी विरोध करण्याची आवश्यकता !

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होणाऱ्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने…

१. अधिक पैशाच्या मोहामध्ये धर्मांधांना भूमी विकणाऱ्या हिंदूंमुळे अन्य हिंदूंनाही घरदार सोडून पलायन करण्याची वेळ येणे

भारतात ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, हॉटेल, व्यापार किंवा रोजगार जिहाद आणि आपण वाचतो किंवा ऐकतो, तो वैचारिक जिहाद असे काही मुख्य जिहाद आहेत. या सर्वांमध्ये ‘लँड जिहाद’ सर्व जिहादांना जोडला गेलेला आहे. हे जिहाद एकमेकांना अथवा परस्परांवर अवलंबून आहेत. ‘लँड जिहाद’ हा अरबांपासून चालू झाला आहे. कुराण आणि तलवार हातात घेऊन त्यांनी संपूर्ण विश्वात त्यांचे शासन वाढवले, तेथील राज्याची लूट करण्यासह लोकांची कत्तल केली अन् स्त्रियांना पळवून नेले. त्यानंतर मीर-कासिम, अल्लाउद्दिन खिलजी, महंमद घोरी असे अनेक आक्रमक आले आणि शेवटी मोगलांची सत्ता आली. या सर्वांनी याचीच पुनरावृत्ती करत ‘लँड जिहाद’च्या माध्यमातून भारत कह्यात घेण्यास आरंभ केला. सध्या यात थोडा पालट झाला आहे एवढेच.

धर्मांध प्रथम हिंदूंची सोसायटी किंवा गल्ली येथे अधिक रक्कम देऊन एखादी जागा खरेदी करतात. त्यानंतर त्याच परिसरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. त्यात सामूहिक भोजन ठेवून सर्वजण टोपी घालून फिरतात. कार्यक्रमाचे उष्टे पडलेले अन्न तेथेच टाकून जातात. कुणी हिंदु त्याविषयी सांगायला गेला, तर भांडण करतात. हिंदु समाज मुळात शांत असल्यामुळे त्याला भांडण नको असते. या सर्व गोष्टींचा त्याच्यावर दबाव निर्माण होतो. त्यामुळे हळूहळू सर्व हिंदू ती जागा सोडतात. एक घर खरेदी केल्यावर दुसरे, नंतर तिसरे असे करत करत अनेक घरे अल्प भावात ते खरेदी करतात.

अधिवक्ता नीरज जैन

२. जम्मू-काश्मीरमध्ये धर्मांध सरकारी कर्मचाऱ्यांनी हिंदूंच्या कागदपत्रांच्या नावांमध्ये पालट केल्याने हिंदूंना त्यांच्या संपत्तीवर पाणी सोडावे लागणे

आपण पंजाबमध्ये ज्या प्रकारे सैलावर येथे आक्रमण झाले, ते पाहिले असेल. उदाहरणार्थ, पंजाबमध्ये प्रारंभी ते एक गवळी बनून येतात. ते सरकारी भूमी कह्यात मिळवण्याच्या हेतूने त्या ठिकाणी गाय-बैल वगैरे बांधून ठेवतात आणि दुधाचा व्यवसाय चालू करतात. ते स्थिर स्थावर झाले की, बाहेरून येणाऱ्या त्यांच्या धर्मबांधवांना आश्रय देतात. जम्मू-काश्मीरमध्ये हे लोक रहायला आले. तेथील राजभाषा उर्दू होती. उर्दूमुळे हिंदू शिकत नव्हते; परंतु मुसलमान उर्दू शिकत होते. यामुळे सरकारी चाकरीमध्ये सर्व मुसलमानांनी प्रवेश केला. त्यांनी ग्रामीण भागातील व्यक्ती किंवा शेतकरी या लोकांचे सर्व ‘रेव्हन्यू रेकॉर्ड’ (महसूली नोंदी) त्यांच्या कह्यात घेतल्या आणि त्यातील नावे पालटली. याविषयी हिंदूंना काही समजले नाही. जेव्हा समजले तोपर्यंत फार उशीर झाला होता. न्यायालयात कागदपत्रे पाहिली जातात. आपल्या न्यायालयांमध्ये पुराव्यांच्या आधारावर कार्य चालते. त्यामुळे हिंदूंना तेथून काढता पाय घ्यावा लागला. नंतर ज्यांनी तेथून पलायन केले नाही, त्यांच्यावर आक्रमणे करण्यात आली.

३. धर्मांधांनी पूल आणि रेल्वे फाटक यांच्या परिसरात मजार किंवा मशिदी उभारून भूमी कह्यात घेणे

चार वर्षांपूर्वी चेन्नई येथील एका इंग्रजी वर्तमानपत्रात ‘ईस्ट कोस्टल रोड’ नावाचे एक विज्ञापन प्रसिद्ध झाले होते. त्यात असे लिहिले होते, ‘पूर्वाेत्तर भारतामध्ये प्रत्येक २ किलोमीटर अंतरावर मशीद बांधायची आहे. त्यामुळे त्यासाठी भूमी पाहिजे.’ अशाच प्रकारे ख्रिस्त्यांनीही एक विज्ञापन काढले होते. त्यात त्यांनी ‘प्रत्येक पिनकोडच्या क्रमांकावर (प्रत्येक जिल्ह्यात) एक चर्च बनवायचे आहे’, असे म्हटले होते. या सर्वांमागे आपल्याला एक विचारसरणी आढळून येते. मी भारतात जेथे जेथे जाऊन आलो, तेथे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे जिथे जिथे जेवढे मोठे पूल आहेत, त्याच्या आसपास कुठे ना कुठे एक किलोमीटरच्या परिसरात आपल्याला मजार मिळेल. त्याच प्रमाणे भारतात जेवढे रेल्वे फाटक आहेत, त्या फाटकाच्या एक किलोमीटरच्या परिसरातही कुठे ना कुठे मजार दिसेल. वर्ष २००२ मध्ये गुजरातमध्ये जे हत्याकांड झाले, त्याच्या मागेही हेच कारण आहे. रेल्वेचा नियम आहे की, त्याच्या १ किलोमीटरच्या परिसरात गोदाम नसायला पाहिजे; परंतु दुर्दैवाने गोध्राच्या जवळ ५०० मीटरच्या आत, तर काही ठिकाणी रेल्वे रूळापासून १०० मीटर अंतरावर मजार बनले आहेत. तेथे २-३ ठिकाणी मशिदीही बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळेच गोध्रा हत्याकांड घडले. आपल्या ५९ कारसेवकांना जाळून मारण्यात आले. त्याची जी प्रतिक्रिया हिंदूंकडून उमटली, तिलाच केंद्रीभूत करून पुनःपुन्हा त्यावर चर्चा केल्या जातात आणि हिंदूंनाच दंगलखोर ठरवले जाते. हाच ‘वैचारिक जिहाद’ आहे.

४. ‘गुजरात डिस्टर्ब एरिया ॲक्ट’ (गुजरात अशांत क्षेत्र कायदा) प्रमाणे देशातील अन्य राज्यांमध्येही कायदा करण्यासाठी हिंदूंनी सरकारला भाग पाडावे !

प्रत्येक पूलाजवळ आणि प्रत्येक रेल्वे फाटकाच्या जवळ मजार किंवा मशिदी बनवल्या आहेत. त्यामागे विशेष कारण आहे. येणाऱ्या काळात पाकिस्तानशी युद्ध झाले, तर भारताच्या प्रत्येक गावात एक गृहयुद्ध होऊ शकते. त्याची धर्मांध सिद्धता करत आहेत. गुजरातमध्ये धर्मांध हे हिंदूंची घरे मातीमोल भावात खरेदी करत आहेत. त्यामुळे हिंदु जागरण मंच आणि हिंदु जनजागृती समिती यांनी एकत्रितपणे गुजरातमध्ये अनेक मोर्चे काढले. परिणामी गुजरात सरकारला ‘डिस्टर्ब एरिया ॲक्ट’ आणावा लागला. २ वर्षांपूर्वी आणलेल्या ‘गुजरात डिस्टर्ब एरिया ॲक्ट’मुळे गुजरातमध्ये कुठेही हिंदूबहुल परिसरात मुसलमान घर खरेदी करू शकत नाही. हा या कायद्याचा प्रभाव आहे. माझी सर्व हिंदु बांधवांना विनंती आहे की, ‘गुजरात डिस्टर्ब एरिया ॲक्ट’प्रमाणे त्यांच्या भागातही कायदा करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनपत्र दिले पाहिजे.

५. ‘लँड जिहाद’चा ‘लव्ह जिहाद’शी संबंध आणि त्या माध्यमातून केली जाणारी फसवणूक

‘लँड जिहाद’ हा ‘लव्ह जिहाद’शी जोडला गेलेला आहे. ‘पोक्सो’ कायदा येण्यापूर्वी धर्मांध १४ ते १८ वर्षांच्या मुलींना उचलून घेऊन जात होते. आता ज्या आईवडिलांना एकुलती एक मुलगी असेल, अशा मुलींना लक्ष्य केले जाते. दुसरे सनदी अधिकाऱ्यांच्या मुलींना लक्ष्य केले जाते. ज्या मुलींच्या वडिलांकडे चांगली धनसंपत्ती आहे, त्या मुलींना लक्ष्य करणे आणि नंतर तिची भूमी हिरावून घेऊन ती ‘लँड जिहाद’साठी वापरण्याचा त्यांचा हेतू असतो. सनदी अधिकाऱ्याची मुलगी फसली, तर त्यांच्याद्वारे हवी ती कामे करवून घेता येतात. अशा प्रकारे बडोद्याच्या आय.ए.एस्. अधिकाऱ्याच्या मुलीला एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरणाऱ्या धर्मांधाने प्रेमाच्या जाळ्यात फसवले होते. जी मुलगी कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली आहे, जी मुलगी कायद्याचे शिक्षण घेत आहे, जी मुलगी एम.बी.ए. करत आहे, जी मुलगी पी.एच.डी. करत आहे , ती पेट्रोल भरणाऱ्याच्या जाळ्यात कशी काय फसली ? तर त्यासाठी एक पूर्ण वर्तुळ बनवून प्रयत्न केला जातो. ५ लोकांचा गट असतो. ते सर्व मिळून एकमेकांना प्रयत्न करत असतात. जो सर्वप्रथम मुलीला फसवतो, त्याला पहिले २ लाख रुपये दिले जातात.

बिहारमध्ये पुष्कळ भूमी असणाऱ्या एका आय.ए.एस्. अधिकाऱ्याच्या मुलीला ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवले होते. बडोद्यापासून ३० किलोमीटर अंतरावर दबोई नावाचा एक तालुका आहे, तेथे बहुतांश पटेल समाजाचे लोक आहेत. त्यांच्या समाजात मुलींचे प्रमाण अल्प असल्याने ते अन्य समाजातील मुलींशी विवाह करतात. जसे पटेल आहेत, नायका, राठवा, वसावा आहेत, तर त्या मुलींना फसवले, तर या विवाहित स्त्रियांना तिच्या आईवडिलांची भूमी मिळते आणि ॲट्रोसिटीचा लाभही मिळतो. एक कायदा असा आहे की, ‘मुलीने कोणत्याही धर्मातील व्यक्तीशी विवाह केला, तरी तिला पितृक संपत्तीमधील बरोबरीचा वाटा मिळेल’, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. हा कायदा आम्हा हिंदूंचा घात करणारा आहे. याविरुद्ध जनजागृती करून आपल्याला पुढे जावे लागेल; कारण हा कायदा मुसलमानांसाठी अधिक योग्य आहे.

६. धर्मांधांनी हिंदूंचे व्यवसाय लाटणे

भारतात महामार्गांवर जी उपाहारगृहे आहेत, त्यांना मारुतिनंदन, शिवकृपा, कृष्णमुरारी अशी नावे दिलेली असतात; परंतु त्याचा मालक मुसलमान असतो, ते आपल्याला ठाऊकच नसते. यातून हिंदूंचा व्यवसाय हिरावून घेतला जात आहे. कालपर्यंत कसायांचे चामडी सोलणे एवढेच काम होते. आज ते हिंदु चांभारांना हटवून चप्पल बनवण्याच्या व्यवसायामध्ये आले आहेत. कापड उद्योगामध्ये यांनी शिरकाव केला आहे. भ्रमणध्वनी संचाच्या व्यवसायामध्ये सर्व मुसलमान आहेत. त्यांच्याकडे काम करणारा विक्रेता, प्रतिनिधी सर्वच्या सर्व हिंदु असतात. या ठिकाणी हिंदु मुलींना फसवण्याचे सर्वांत मोठे कार्य चालते.

७. सर्व जिहादच्या विरोधात मैदानात उतरून लढाई करण्यासही सिद्ध रहावे !

आपण जर ‘लँड जिहाद’ पूर्णपणे समजू शकलो, तर निश्चितच आपण ‘लव्ह जिहाद’लाही अटकाव करू शकतो. तसेच व्यवसाय, रोजगार, हॉटेल आणि वैचारिक जिहादलाही अटकाव घालू शकतो. वैचारिक जिहादमध्ये ज्याप्रमाणे हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना कार्य करत आहेत, त्या कार्यात अधिकाधिक युवकांना सहभागी करून घ्यावे. या कार्याला निश्चितपणे भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद लाभेल. मला असे वाटते की, आपण सर्वांनी एकत्रित येऊन या सर्व जिहादांना अटकाव करू शकू. हिंदु धर्माच्या जय जयकारासाठी या जिहादच्या विरोधात आपण वैचारिक स्वरूपात लढाई केली पाहिजे.

– अधिवक्ता नीरज जैन, हिंदु धर्माभिमानी

संपादकीय भूमिका

विविध प्रकारच्या जिहादच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन लढा देण्यासह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मागणी करायला हवी !