सर्वेक्षणाचा आदेश देण्याचा परिणाम भोगण्यास सिद्ध रहा !

मुसलमान संघटनेकडून ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा आदेश देणार्‍या न्यायाधिशांना धमकीचे पत्र

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापीच्या प्रकरणी सर्वेक्षणाचा आदेश देणारे दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांनी धमकीचे पत्र मिळाले आहे. ‘सर्वेक्षणाचा आदेश देण्याचा परिणाम भोगण्यास सिद्ध रहा’ असे या पत्रात म्हटले आहे. यानंतर न्यायाधीश दिवाकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. वाराणसीचे पोलीस आयुक्त ए. सतीश गणेश यांनी सांगितले की, न्यायाधिशांना हे पत्र ‘इस्लामिक आगाज मूव्हमेंट’ नावाच्या संघटनेने पाठवले आहे. त्यावर पत्र पाठवणार्‍याचे नाव काशिफ अहमद सिद्दीकी असे लिहिण्यात आले आहे.

या पत्रात लिहिलले आहे की,

१. आता न्यायाधीशही भगव्या रंगाशी संबंध ठेवणारे झाले आहे. कट्टरतावादी हिंदूंना आणि त्यांच्या सर्व संघटनांना खुश करण्यासाठी ते निर्णय देतात. त्यानंतर होणार्‍या परिणांसाठी मुसलमानांना उत्तरदायी ठरवतात.

२. तुम्ही न्यायालयीन काम करत आहात. तुम्हाला सरकारी यंत्रणेकडून सुरक्षाही मिळाली आहे, तरी तुमची पत्नी आणि आई यांना भीती का वाटते ?

३. तुम्ही म्हटले होते, ‘ज्ञानवापी परिसराचे निरीक्षण एक सामान्य प्रक्रिया आहे.’ तुम्हीही मूर्तीपूजक आहात. तुम्ही मशिदीला मंदिर घोषित कराल. आता मुसलमान जागा झाला आहे. आता तो त्याचा अधिकार सोडणार नही. सर्वेक्षणाचा आदेश देण्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल.

संपादकीय भूमिका

  • स्वतःला भारतात असुरक्षित समजणार्‍या मुसलमानांच्या संघटना कायदा हातात घेत थेट न्यायाधिशांना धमकी देतात आणि भारतातील निधर्मीवादी राजकीय पक्ष त्याविषयी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • सर्वेक्षणामुळे सत्य इतिहास समोर आल्याने मुसलमान संघटनांनाचा जळफळाट झाला आहे, हे उघड आहे. त्यातूनच अशा धमक्या दिल्या जात आहेत. ‘भविष्यात ज्ञानवापी हिंदूंना मिळाल्यावर काय होईल ?’, याचा विचार करून हिंदूंनी आता स्वतःच्या सुरक्षेचा विचार करावा !