शुक्रवारच्या नमाजावर बंदी घालण्याची मागणी केल्याने हिंदु महासभेच्या राष्ट्रीय सचिव डॉ. पूजा पांडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद

हिंदु महासभेच्या राष्ट्रीय सचिव डॉ. पूजा पांडे

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील शुक्रवारच्या नमाजावर बंदी घालण्याची मागणी केल्याच्या प्रकरणी अखिल भारतीय हिंदु महासभेच्या राष्ट्रीय सचिव डॉ. पूजा शकुन पांडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच येथील अपर नगर मॅजिस्ट्रेटकडून नोटीसही बजावण्यात आली आहे. या नोटिसीला उत्तर देतांना डॉ. पूजा पांडे यांनी म्हटले आहे की, जर खरे बोलल्याने कुणाच्या भावना दुखावत असतील, तर मी खेद व्यक्त करते.

संपादकीय भूमिका

नमाजपठणानंतर दंगली झाल्याच्या किंवा सुरक्षादलाच्या सैनिकांवर दगडफेक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे ‘अशी मागणी करण्याची वेळ हिंदूंवर का आली ?’, त्याचा विचार न करता ती करणार्‍यांवर गुन्हा नोंदवणारे पोलीस भारताचे कि पाकचे ?