मुंबई – महाराष्ट्रात सातत्याने दंगलसदृश्य स्थिती निर्माण करणार्या रझा अकादमीकडून ५ जून या दिवशी मिनारा मशिदीसमोर काश्मिरी हिंदूंच्या हत्येच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. या निदर्शनाच्या वेळी ‘काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार थांबवा’, ‘काश्मीरमधील अत्याचार थांबला पाहिजे’, ‘अत्याचार करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करायला हवी’, असे फलक निदर्शकांनी हातात धरले होते. या वेळी रझा अकादमीचे अध्यक्ष महंमद सईद नुरी यांनी काश्मिरी हिंदूंच्या हत्येचा निषेध केला. वर्ष २०१२ मध्ये आझाद मैदान येथे मोर्चा काढून दंगल घडवणे, त्रिपुरामध्ये हिंदूंनी मशीद पाडल्याची अफवा पसरून महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसलमानांना उसकावून दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणे, ठाणे येथे २ पोलिसांना जिवंत जाळणे या महाराष्ट्रातील हिंसक घटनांमागे रझा अकादमीचा हात असल्याचे उघड झाले आहे. तसेच दंगलखोरांनी महिला पोलिसांचा विनयंभग केला होता, ‘अमर जवान’ या सैनिकांच्या स्मारकाला लाथ मारून ते तोडले होते. सातत्याने हिंदूंना लक्ष्य करणार्या रझा अकादमीने काश्मिरी हिंदूंच्या हत्येच्या विरोधात केलेल्या निदर्शनाविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
संपादकीय भूमिकादंगली घडवून हिंदुद्वेष दर्शवणार्या ‘रझा अकादमी’चा हा प्रकार म्हणजे ‘काश्मिरी हिंदूंवरील खोट्या प्रेमाचा आलेला पुळका’ असे म्हटल्यास चूक ते काय ? |