‘ईश्वरपूर येथील पू. राजाराम नरुटे यांची दिवसांत १० टक्के आध्यात्मिक पातळी कशी वाढली ?’, याविषयी त्यांचे पुत्र श्री. शंकर नरुटे यांना सुचलेली सूत्रे !

‘ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम नरुटे यांची अत्यल्प दिवसांत १० टक्के आध्यात्मिक पातळी कशी वाढली ?’, याविषयी त्यांचे पुत्र ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शंकर नरुटे यांना सुचलेली सूत्रे !

२३.२.२०२२ या दिवशी माझे वडील श्री. राजाराम नरुटे यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. ११.३.२०२२ या दिवशी ते रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर १३.३.२०२२ या दिवशी त्यांना संत म्हणून घोषित केले. या संदर्भात काही साधकांनी मला विचारले, ‘‘वडिलांचे आधीचे छायाचित्र जुने होते का ?’’ काही साधक म्हणाले, ‘‘तुझे वडील अत्यल्प दिवसांत ७१ टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत कसे पोचले ? १८ दिवसांत त्यांची आध्यात्मिक पातळी १० टक्क्यांनी कशी वाढली ? त्यांनी विशेष काय प्रयत्न केले ?’’

पू. राजाराम नरुटे

१. वडिलांची अत्यल्प दिवसांत प्रगती होण्याविषयी सुचलेली सूत्रे

अ. ज्या वेळी वडिलांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित केले, तेव्हा त्यांचे काही लिखाण वाचून आणि छायाचित्राचे परीक्षण करून सांगितले असेल.

आ. वडील रामनाथी आश्रम पहायला आले असतांना त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाल्यावर गुरुकृपेने त्यांच्यातील संतत्व प्रगट झाले. छायाचित्रापेक्षा तो साधकजीव समोर आल्यावर त्याच्यातील वैशिष्ट्ये अधिक चांगल्या प्रकारे लक्षात आली, असेही कारण असू शकते. वडिलांच्या छायाचित्रातील भावापेक्षा त्यांच्या बोलण्यातून  भाव अधिक प्रगट होतात. ते गुरुदेवांशी बोलल्यामुळे त्यांच्यातील अजून वेगळ्या प्रकारचे भाव प्रगट झाले. वडिलांना ‘परात्पर गुरु डॉक्टर अवतारच आहेत’, याची प्रचीती आली. ते गुरुदेवांशी आत्मा, आत्मज्ञान आदी वेगवेगळ्या विषयांवर बोलू लागले.

इ. या सर्वांतून लक्षात येते, ‘वडील परात्पर गुरु डॉक्टरांशी बोलल्यावर त्यांनी वडिलांची चालू असलेली आंतरिक साधना जाणली. त्यामुळे त्यांच्या अंतरातील भाव जागृत होऊन ‘त्यांच्यात संतत्व आहे’, हे प्रगट झाले.

– श्री. शंकर राजाराम नरुटे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.३.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक