नुकतीच मथुरा (उत्तरप्रदेश) येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीच्या संदर्भात दिवाणी न्यायालयात नव्याने याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. यात ही मशीद म्हणजे केशवदेव मंदिराचे गर्भगृह असून तेथे पहाटे साडेचार वाजता भोंग्यांवरून देण्यात येणाऱ्या अजानवर बंदी घालण्यात यावी, तसेच या परिसराचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.