मध्यप्रदेशातील सुराणा कुटुंबाने ११ कोटी रुपयांची संपत्ती दान करून घेतला संन्यास !

बालाघाट (मध्यप्रदेश) – येथील कोट्यधीश राकेश सुराणा यांनी त्यांची ११ कोटी रुपयांची संपत्ती दान करत पत्नी आणि मुलगा यांच्यासमवेत संन्यास घेतला. २२ मे या दिवशी जयपूर येथे ते दीक्षा घेणार आहेत. सुराणा हे बालाघाट येथील दागिन्यांचे व्यापारी आहेत. राकेश सुराणा आणि त्यांची पत्नी लीना यांना लहानपणापासूनच अध्यात्मच्या मार्गावर जायचे होते. त्यांचा मुलगा अमेय यानेही तो ४ वर्षांचा असतांना  साधनाच करण्याचा निश्‍चय केला होता. सुराणा परिवाराने त्याची सर्व संपत्ती गोशाळा आणि अनाथाश्रम यांना दान केली आहे.

संपादकीय भूमिका 

व्यवहाराची मर्यादा लक्षात आल्याने अध्यात्माची कास धरण्याचे हे आणखी एक उदाहरण ! अशा असंख्य उदाहरणांमुळेच ज्यांना बुद्धी आणि त्याद्वारे मिळणारे सुख हेच सर्वश्रेष्ठ वाटते, अशा बुद्धीप्रामाण्यावाद्यांची कीव आल्याखेरीज रहात नाही !