‘गोवा ही ‘वास्को’ आणि ‘झेवियर’ची भूमी आहे’, असे सांगून त्यांचा उदोउदो केला जातो. याच झेवियरने गोव्यात ‘इन्क्विझिशन’ (धर्मच्छळ) लागू केले. त्या काळात येथील ‘हात कातरो’ खांब एकमात्र महत्त्वाचा पुरावा शेष राहिला आहे. याच खांबाला बांधून त्या काळी हिंदूंचे हात कापले गेले. त्या खांबाचा हा इतिहास सरकार आणि पुरातत्व विभाग यांच्या माध्यमातून पुसण्याचे षड्यंत्र चालू आहे. गोव्यात ‘हात कातरो’ खांबचे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोर्तुगिजांनी केलेल्या अत्याचाराचा इतिहास लपवला जात आहे; मात्र हिंदु समाज आता जागृत होत असून गोव्यात झालेले ‘इन्क्विझिशन’ आणि ‘हात कातरो’ खांब यांद्वारे हिंदु समाजावर केलेला अत्याचार समोर आणल्याखेरीज आम्ही स्वस्थ बसणार नाही.