कर्नाटक सरकारने राज्यातील अवैध चर्च पाडून टाकावीत ! – प्रमोद मुतालिक यांचे आवाहन

श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक

मैसुरू (कर्नाटक) – माझ्याकडे कर्नाटक राज्यातील अवैध चर्च यांची माहिती आहे. मी सरकारला विनंती करीन की, अशी अवैध चर्च पाडून टाकण्यात यावीत, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष  श्री. प्रमोद मुतालिक यांनी येथे एका सभेत केले. तसेच त्यांनी ‘सरकारने दिलेल्या रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनीक्षेपक न वाजवण्याच्या आदेशाची कार्यवाही न करणार्‍या अधिकार्‍यांना परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणीही दिली.

राज्यातील भाजप सरकारने यापूर्वी म्हणजे १६ ऑक्टोबर २०२१ या दिवशी ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंच्या होणार्‍या बलपूर्वक धर्मांतराला चाप बसवण्यासाठी राज्यातील विविध चर्च यांचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून कारवाई केली पाहिजे !