१. ‘६.११.२०२१ या दिवशी दीक्षितआजी (श्रीमती विजया नीलकंठ दीक्षितआजी (वय ८९ वर्षे)) कणगलेकरकाकूंच्या (श्रीमती दीक्षितआजी यांच्या कन्या सौ. अंजली कणगलेकर (वय ६६ वर्षे) यांच्या) समवेत आमच्या घरी आल्या होत्या. तेव्हा मला वाटले की, आमच्या घरी कुणीतरी संतच आले आहेत.
२. ‘त्यांना केवळ ‘आजी’ न म्हणता ‘पू. आजी’ म्हणावे’, असे मला वाटत होते.
३. जेव्हा मी त्यांना नमस्कार केला, तेव्हा ‘मी एखाद्या संतांनाच नमस्कार करत आहे’, असे मला वाटले.
४. ‘त्यांच्याकडून शक्ती मिळत आहे’, असे मला जाणवले. ती शक्ती लाल रंगाची होती.
५. मला त्यांच्या स्पर्शात चैतन्य जाणवले. ते चैतन्य पिवळ्या रंगाचे होते.
६. ‘आजी लवकरच संत होतील’, असे मला वाटले.’
(‘१७.११.२०२१ या दिवशी श्रीमती विजया नीलकंठ दीक्षितआजी संत झाल्याचे घोषित करण्यात आले.’ – संकलक)
– कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), फोंडा, गोवा. (७.११.२०२१)
(‘ही सूत्रे श्रीमती दीक्षितआजी संत होण्यापूर्वीची असल्याने त्यांचा उल्लेख ‘पूज्य’ असा केलेला नाही.’ – संकलक)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |