उत्तर कोरियाने आमच्यावर पुन्हा क्षेपणास्त्र डागले ! – दक्षिण कोरियाचा दावा

सेऊल (दक्षिण कोरिया) – उत्तर कोरियाने पूर्वेकडील आमच्या अज्ञात परिसराला लक्ष्य करत पुन्हा एकदा क्षेपणास्त्र डागले, असा दावा दक्षिण कोरियाच्या सैन्याने केला. उत्तर कोरियाने आणखी एका क्षेपणास्त्राची चाचणी केली, असा दावाही दक्षिण कोरियाने केला आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी अनेकदा ‘आवश्यकता भासल्यास कधीही आण्विक शस्त्रांंचा वापर करू शकतो’, अशी थेट धमकी दिली आहे. अशा परिस्थितीत उत्तर कोरियाने आता क्षेपणास्त्राची चाचणी केल्याने दक्षिण कोरिया संतापला आहे.

उत्तर कोरियाने यावर्षी आतापर्यंत १३ वेळा क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. या चाचणीत आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीचासुद्धा समावेश आहे. याविषयी तज्ञांचे म्हणणे आहे की, निर्बंधांमध्ये सवलत आणि इतरही सवलती मिळण्यासाठी अमेरिकेवर दबाव आणण्याच्या उद्देशाने उत्तर कोरिया सातत्याने शस्त्रास्त्रांची चाचणी करत आहे.