
मुंबई – महंमद अन्सारी (वय २२ वर्षे) याने त्याची हिंदु प्रेयसी सोनम शुक्ला (वय १८ वर्षे) हिची तारेने गळा आवळून निर्घृण हत्या केली. हत्या करून मंहमद याने तिचा मृतदेह पोत्यात भरून मालाड (पश्चिम) येथील नाल्यात फेकून दिला. ‘नाल्यातील मासे मृतदेह खाऊन टाकतील’, या अंदाजाने त्याने ही कृती केली. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी महंमद याला अटक केली आहे. त्याचा बेकरीचा धंदा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम शुक्ला ही गोरेगाव येथे रहात होती. २५ एप्रिल या दिवशी दुपारी ४ वाजता ती खासगी शिकवणुकीला जाण्यासाठी घरातून निघाली; मात्र रात्री ११.३० वाजेपर्यंत ती घरी आली नाही. यानंतर तिच्या पालकांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर २८ एप्रिल या दिवशी सोनम हिचा मृतदेह अत्यंत विद्रूप स्थितीत आढळला. रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय पडताळणीनंतर तो मृतदेह सोनम हिचाच असल्याचे आढळून आले.
भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा आरोप केला. ‘देशभरात अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असून या प्रकरणावर चर्चा झाली पाहिजे’, अशी मागणीही त्यांनी केली.
संपादकीय भूमिका‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून करण्यात येणार्या हिंदु युवतींच्या हत्यांविषयी पुरोगामी आणि तथाकथित धर्मनिरपेक्षवादी गप्प का ? |
Amroha Conversion : अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे नाव पालटून रुग्णालय चालवणार्या मुसलमानाकडून हिंदु परिचारिकेचे धर्मांतर
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू