नेल्लोर (आंध्रप्रदेश) येथे हनुमान शोभायात्रेवर धर्मांधांनी अवैध मशिदीतून दगड आणि मद्याच्या बाटल्या फेकल्या !

शोभायात्रेत होती १५ सहस्र हिंदूंची उपस्थिती !

नेल्लोर (आंध्रप्रदेश) – येथे २४ एप्रिल या दिवशी श्री हनुमान शोभायात्रा काढण्यात आली असता तिच्यावर अवैध मशिदीमधून दगडफेक करर्‍यात आली. तसेच मिरवणुकीतील हनुमानाच्या मूर्तीवर मद्याच्या बाटल्याही फेकण्यात आल्या. या प्रकरणी अवैध मशिदीच्या बांधकामावर कारवाई करून ती पाडण्यात यावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्रप्रदेश राज्याचे सह प्रभारी (एखाद्या विभागाचे दायित्व सांभाळणारे) सुनील देवधर यांनी ही मागणी केली आहे. १५ सहस्र हिंदूंचा सहभाग असणारी ही हनुमान शोभायात्रा येथील कोर्ट रोड मार्गावरून जात असतांना हे आक्रमण करण्यात आले. या वेळी धर्मांधांकडून इस्लामी घोषणा दिल्या जात होत्या.

         संपादकीय भूमिका 

  • १५ सहस्र हिंदू असतांनाही मूठभर धर्मांध त्यांच्यावर दगडफेक करण्यास धजावतात आणि हिंदू मार खातात, हे हिंदूंना लज्जास्पद ! हिंदू संघटित असले, तरी धर्मांधांना त्यांची भीती वाटत नाही, हे यातून स्पष्ट होते. ‘हिंदू असहिष्णु असल्याने आणि राज्य सरकार आमच्या बाजूचे असल्याने हिंदू आमचे काहीच वाकडे करू शकत नाहीत’, हा विश्‍वास धर्मांधांमध्ये असल्याने ते आक्रमण करण्यास धजावतात, हे लक्षात घ्या !
  • मशीद अवैध असतांनाही तिच्यावर आतापर्यंत कारवाई कशी झाली नाही ? आता तरी तिच्यावर कारवाई करण्याचे धाडस राज्यातील वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकार दाखवणार कि मतांच्या लांगूलचालनापोटी शेपूट घालणार ?
  • हिंदूंना असहिष्णु ठरवून मुसलमानांना पीडित दाखवणारे राजकीय पक्ष आता गप्प का आहेत ?