हिंदूंनो स्वभाषा, स्वराष्ट्र आणि स्वधर्म यांचा अभिमान बाळगा ! – सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समिती

भुयेवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी ५०० हून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती

भुयेवाडी (जिल्हा कोल्हापूर), १४ एप्रिल (वार्ता.) – आज संपूर्ण भारतात जिहादी मानसिकतेने धुमाकूळ घातला आहे. ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या माध्यमांतून हिंदू संकटात आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या धर्माविषयी धर्मरक्षणाविषयी जागृत झाले पाहिजे. त्याचसमवेत हिंदूंनी स्वभाषा, स्वराष्ट्र आणि स्वधर्म यांचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी केले. त्या ११ एप्रिल या दिवशी भुयेवाडी गावातील समाधान तालीम येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होत्या. या सभेसाठी सभेसाठी ५०० हून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती होती.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेत मार्गदर्शन करतांना सौ. राजश्री तिवारी आणि श्री. आदित्य शास्त्री
सभेसाठी उपस्थित धर्माभिमानी
सभेसाठी उपस्थित धर्माभिमानी

सभेच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर गावातील ज्येष्ठ श्री. राजाराम उरुणकर यांनी श्री. आदित्य शास्त्री आणि सौ. राजश्री तिवारी यांचा सन्मान केला.

क्षणचित्रे

१.  गावातील काही मुलांनी हिंदु धर्मावर होणार्‍या आघाताविषयी जागृती व्हावी यासाठी केवळ १० दिवसांमध्ये सभेच्या प्रसाराचे आणि सभेचे आयोजन उत्कृष्ट पद्धतीने केले.

२. निगवे, जठारवाडी आणि शिये या गावातील काही धर्मप्रेमी सभेसाठी उपस्थित होते.

३. सभा झाल्यावर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

४. सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाचा गावातील जिज्ञासूंनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला.

५. अन्य गावातील मुलांनी अशाप्रकारे हिंदु राष्ट्र-जागृती सभा आमच्या गावातही घ्या, अशी मागणी केली.