प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांचे जातीयवादी विधान
|
मुंबई – बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेली दंगल असो किंवा भीमा कोरेगावची दंगल असो, आपण हेच बघितले की, दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय किंवा ब्राह्मण असतात. (ब्राह्मणद्वेषापायी धर्मांध करत असलेल्या कुकृत्याचे खापर ब्राह्मणांवर फोडणारे सुजात आंबेडकर ! – संपादक)
दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय ब्राह्मण असतात; सुजात आंबेडकरांचे वादग्रस्त विधानhttps://t.co/z3DwORxw4q
— Maharashtra Times (@mataonline) April 12, 2022
राज ठाकरे यांना दंगल पेटवायची असेल, तर स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवावे. बहुजन समाजातील पोरांना उतरवू नका, असे विद्वेषी वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी संभाजीनगर येथील एम्.जी.एम् महाविद्यालयातील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना केले.