गुजरातमधील भाजप सरकारने या घटनेची नोंद घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि धर्मांधांचे असे आक्रमण करण्याचे पुन्हा धाडस होऊ नये, यासाठी सरकारी यंत्रणांनी त्यांच्यावर वचक निर्माण करावी, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

आणंद (गुजरात) – आणंद जिल्ह्यातील पेटलाड शहराजवळील बोरिया गावामध्ये हिंदूंची धार्मिक मिरवणूक मशिदीसमोरून जात असतांना धर्मांधांनी तिच्यावर दगडफेक केल्याने हिंसाचार झाला. यात ५ जण घायाळ झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला.
मिरवणुकीमध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजले जात असतांना धर्मांधांनी याचा विरोध केल्यावर दोन्ही समुदायांमध्ये वाद झाला. त्यानंतर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी १०० जणांवर गुन्हा नोंदवला आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !