कर्नाटकमध्ये धर्मांधांकडून हिंदू, ख्रिस्ती तरुणांच्या हत्या होत असतांना निधर्मीवादी मात्र मौन बाळगून आहेत ! त्यांना धर्मांधांची ही असहिष्णुता दिसत नाही, हे लक्षात घ्या !

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे चंद्रू नावाच्या २२ वर्षीय ख्रिस्ती तरुणाची उर्दू भाषा न बोलल्याने तिघा धर्मांधांनी चाकू खुपसून हत्या केली. ही घटना ५ एप्रिलला हळेगुड्डदहळ्ळी येथे झाली. चंद्रू दुचाकीवरून जात असतांना त्याने दुसर्या एका दुचाकीला हलकीशी धडक दिली. त्या गाडीचा चालक शाहिद पाशा याने चंद्रू याच्याशी वाद घातला.
Karnataka: Pasha, Shahid and a juvenile stab Chandru to death for ‘not speaking Urdu’https://t.co/zuCbiZc1W3
— OpIndia.com (@OpIndia_com) April 6, 2022
चंद्रू धर्मांधांशी कन्नड भाषेत बोलत होता. त्याने उर्दू भाषेत संवाद न साधल्याच्या रागातून त्याची चाकू खुपसून हत्या केली. या वेळी शाहिद याचे काही साथीदारही तेथे उपस्थित होते. या घटनेचा सीसीटीव्ही चित्रीकरणही समोर आले आहे. यात काही लोकांच्या हातात तलवारी आणि चाकू दिसत आहेत. हत्येपूर्वी चंद्रू त्याची सुटका करण्यासाठी विनंती करतांनाही दिसत आहे. पोलिसांनी २१ वर्षीय शाहिद पाशा, २२ वर्षीय शाहिद गोली आणि अन्य एक अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.
बौद्ध चकमा, हिंदु हाजोंग आणि धर्मांध रोहिंग्या शरणार्थी !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाचे उदात्तीकरण करून धर्मांधाचा धिंगाणा, अश्लील भाषेत शिवीगाळ !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण