अल्पसंख्य समाजातील मुले चिडल्यावरून केली कारवाई !
|
रांची (झारखंड) – झारखंडच्या जगन्नाथपूर सरकारी ‘पॉलिटेक्निक महाविद्यालया’च्या आवारात हिंदु नववर्ष सोहळ्याच्या वेळी ‘जय श्रीराम’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा देणार्या २ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले, तर एका विद्यार्थ्याला महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले. तसेच शिक्षा म्हणून महाविद्यालयातील जवळपास ५०० हिंदु विद्यार्थ्यांना जेवणही नाकारण्यात आले, असे वृत्त हिंदी दैनिक ‘जागरण’ने प्रसिद्ध केले आहे.
झारखंड के सिंहभूम स्थित जगन्नाथपुर पॉलिटेक्निक कॉलेज में हिन्दू नववर्ष मनाते हुए ‘जय श्रीराम ‘का नारा लगाने वाले 2 छात्र सस्पेंड किए गए।https://t.co/vYvN2uJYYi
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 4, 2022
२ एप्रिल या दिवशी हिंदु नववर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी विद्यार्थी जगन्नाथपूर सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या निवासी वसतीगृहाच्या गच्चीवर जमले. हा सोहळा साजरा होत असतांना काही विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे विशिष्ट समुदायातील धर्मनिरपेक्ष म्हणवणारे विद्यार्थी चिडले. (ज्यांना जय श्रीरामाच्या घोषणा चालत नाहीत, त्यांनी भारतातून चालते व्हावे ! – संपादक) त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे याविषयी तक्रार केली. प्राचार्यांनी वरील कारवाई केली. ‘महाविद्यालयात सर्वच धर्माचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे शिस्तपालन न करणार्या विद्यार्थ्यांना काढून टाकले’, असे सांगत महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने कारवाईचे समर्थन केले.