परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे कोल्हापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे धर्मप्रेमी श्री. पुरुषोत्तम राजाभाई सवसाणी-पटेल (वय ७० वर्षे) !

पुरुषोत्तम सवसाणी-पटेलकाका यांचा दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी भाव !

दैनिक ‘सनातन प्रभात’ ही गीता असून त्याचे प्रत्येकाने वाचन केले पाहिजे !

दैनिक ‘सनातन प्रभात’ ही गीता असून त्याचे प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. मला प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचल्याशिवाय चैन पडत नाही. हे दैनिक वाचण्यासाठी मला ३ घंटे लागतात आणि वाचलेली सूत्रे मी इतरांना सांगतो. वर्ष २००९ मध्ये माझ्याकडे दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले. ज्या दिवशी दैनिक चालू झाले, तेव्हा पहिल्याच दिवशी माझ्या मनात ‘हिंदु राष्ट्र केवळ गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) निर्माण करू शकतात’, असा विचार आला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणारे तसेच विनम्र असलेले कोल्हापूर येथील धर्मप्रेमी श्री. पुरुषोत्तम सवसाणी-पटेल यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे २९ मार्च २०२२ या दिवशी घोषित करण्यात आले. त्यानिमित्त श्री. सवसाणी-पटेलकाका यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. पुरुषोत्तम पटेल

आधुनिक वैद्या (डॉ.) श्रीमती शिल्पा नितीन कोठावळे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), कोल्हापूर 

आधुनिक वैद्या (डॉ.) श्रीमती शिल्पा कोठावळे

१. सनातन संस्थेने साधकांना आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी सांगितलेली सर्व स्तोत्रे आणि मंत्र काका नियमितपणे म्हणतात अन् ते नामजपही करतात. त्यांचे भगवद्गीतेचे अध्यायही तोंडपाठ आहेत.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

काका गेल्या १० वर्षांपासून सनातन संस्थेच्या संपर्कात आहेत. त्यांचा परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे. परात्पर गुरुदेवांवरील श्रद्धेमुळे काकांना अनेक अनुभूती आल्या आहेत.

श्री. शिवानंद शिवपुत्र स्वामी, कोल्हापूर (वय ४७ वर्षे)

१. श्री. सवसाणी-पटेलकाका यांचा दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी भाव असून त्याचा इतरांना लाभ होण्यासाठी प्रयत्न करणे

मी जेव्हा श्री. सवसाणी-पटेलकाका यांच्याकडे दैनिक ‘सनातन प्रभात’ देण्यासाठी जातो, तेव्हा त्यांचा दैनिक ‘सनातन प्रभात’प्रती भाव माझ्या लक्षात येतो. ते दैनिक ‘सनातन प्रभात’ हातात घेऊन डोक्याला लावून नमस्कार करतात. ‘काकांचे दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून झाल्यावर त्याचा लाभ इतरांना व्हावा’, यांसाठी ते त्यांच्या मित्रांना वाचायला देतात, तसेच कधी कधी मंदिरातही देतात.

२. सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने यांच्या माध्यमातून समाजात धर्मप्रसार करणे

‘सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने समाजापर्यंत कशी पोचतील ?’, असा त्यांचा नेहमी विचार असतो. त्यांचे ऑईल मिलचे (तेल गिरणी) दुकान असून त्या दुकानात ते सनातन संस्थेची उत्पादने विक्रीसाठी ठेवतात.

३. कर्तेपणा न घेणे

एकदा कोल्हापूर येथे हिंदु जनजागृती समितीचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘कार्यक्रमाला तुमच्यामुळे इतके लोक आले.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘जे लोक आले, ते मी बोलावले म्हणून नाही, तर त्यांचे पुण्य होते; म्हणून ते या ठिकाणी आले.’’ यावरून ‘काका स्वतःकडे कर्तेपणा घेत नाहीत’, हे मला शिकायला मिळाले. त्या वेळेपासून ‘माझ्या बोलावण्याने हिंदुत्वनिष्ठ येतात, असे नसून ते त्यांच्या पुण्याईने येतात’, याची मला जाणीव होऊ लागली.

४. काकांमधील ‘प्रेमभाव, नम्रता, चिकाटी, अहं विरहित रहाणे’ हे गुण मला शिकायला मिळाले.

लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (२१.२.२०२२)