मिशिगन (अमेरिका) – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी सरकारच्या धोरणांचा विरोध करत अमेरिकी जनता सर्वांत भयावह कालखंडातून जात आहे, असे म्हटले आहे. ‘राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच हे सर्व घडत असून रशियावर घालण्यात आलेले निर्बंध हा अयोग्य निर्णय होता’, असे ट्रम्प म्हणाले. ‘अमेरिकेला रशिया, चीन अथवा इराण यांच्याकडून धोका नसून डेमोक्रॅट्स पक्षाच्या कट्टर साम्यवादी धोरणांचा खरा धोका आहे. अमेरिकेला एकाच वेळी महागाईत वाढ आणि आर्थिक मंदी या भयानक चक्रातून जावे लागेल’, असेही ते येथे आयोजित एका कार्यक्रमात म्हणाले.