अशी बंदी घालणारा ऑस्ट्रेलियानंतर कॅनडा हा बहुधा दुसरा देश

ओटावा (कॅनडा) – कॅनडा सरकारने देशातील १६ वर्षांखालील मुलांना सामाजिक माध्यमांचा वापर करण्यावर बंदी घालणारे कठोर विधेयक संसदेत सादर केले. लहान मुलांचे सामाजिक माध्यमांचे वाढते व्यसन, ढासळणारे मानसिक आरोग्य आदी दुष्परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून मुलांच्या डिजिटल सुरक्षेसाठी कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे कॅनडाचे सांस्कृतिक मंत्री मार्क मिलर यांनी स्पष्ट केले. या कायद्यानुसार १६ वर्षांखालील मुलांना सामाजिक माध्यमांवर स्वतःचे खाते (अकाऊंट) उघडण्यास मनाई असेल; मात्र संबंधित संकेतस्थळ किंवा ॲप हे मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सिद्ध करू शकले, तर त्यांना नियमांतून सशर्त सूट मिळू शकते.
या कायद्यात आत्महानीला प्रोत्साहन देणारा मजकूर, द्वेषयुक्त प्रचार, हिंसाचाराला उत्तेजन देणारी सामग्री, तसेच अश्लील छायाचित्रे प्रसारित करण्यावर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ‘एआय चॅटबॉट’ विकसित करणार्या आस्थापनांनाही या कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत मुलांच्या सुरक्षेसाठी हस्तक्षेप करण्याचे दायित्व त्यांच्यावर असेल. या कायद्याच्या कार्यवाहीसाठी ‘डिजिटल सेफ्टी कमिशन ऑफ कॅनडा’ ही स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात येणार आहे. यासह वापरकर्त्यांचे वय पडताळण्यासाठी ‘एज व्हेरिफिकेशन’ प्रणाली अनिवार्य केली जाणार आहे. ऑस्ट्रेलियानेही यापूर्वी अशी बंदी घातली आहे.
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani