|
पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणार्या आतंकवाद्यांची पाळेमुळे शोधून ती नष्ट करण्यासाठी सरकारने आता तरी कठोरात कठोर पावले उचलावीत ! यासह आतंकवादाचा निर्माता असलेल्या पाकलाही नष्ट करावे, हाच आतंकवाद संपवण्याचा एकमेव उपाय आहे ! – संपादक

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या मुंबई शाखेला आलेल्या एक ‘ई-मेल’मध्ये पंतप्रधान मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर आक्रमण करण्यासाठी आतंकवाद्यांचे २० छुपे गट (स्लिपर सेल्स) सक्रीय असल्याचे या ‘ई-मेल’मध्ये नमूद करण्यात आले आहे.
’20 Kg RDX, 20 Sleeper Cells’: Threat Mail Sent To NIA Claims Plot To Kill PM Modihttps://t.co/3jzpj6ZCrY pic.twitter.com/w4kHiNnyCA
— ABP LIVE (@abplivenews) April 1, 2022
‘आर्.डी.एक्स्.’च्या साहाय्याने स्फोट घडवून पंतप्रधान मोदी यांचा घातपात करण्यात येईल’, असेही यात नमूद करण्यात आले आहे. सध्या देशातील अन्वेषण यंत्रणांकडून या ‘ई-मेल’संदर्भात अन्वेषण चालू आहे.
आपली ओळख उघड होऊन हा कट फसू नये, यासाठी ‘ई-मेल’ केल्यानंतर आपण आत्महत्या करणार असल्याचेही संबंधित व्यक्तीने सांगितले आहे. ‘ई-मेल’मध्ये सांगितल्याप्रमाणे आक्रमणाची संपूर्ण योजना सिद्ध झाली आहे. हा ‘मेल’ पाठवणार्या व्यक्तीचा आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे.
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’