युक्रेनने प्रथमच रशियावर क्षेपणास्त्र डागले

कीवच्या बाहेरील भागात, युक्रेनियन प्रादेशिक संरक्षण दलाचा सदस्य NLAW अँटी-टँक शस्त्र घेऊन

मॉस्को (रशिया) – गेले ३५ दिवस चालू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये युक्रेनने बचावात्मक पवित्रा सोडून प्रथमच रशियाच्या एका गावातील सैन्यतळावर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केल्याचे वृत्त ‘द डेली मेल’ने प्रसारित केले आहे.

‘नाटो’ देशांचे सैन्य युक्रेन-पोलंड सीमेवर !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या पोलंड दौऱ्यानंतर ‘नाटो’ (नॉर्थ ॲटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) देशांचे सैन्य युक्रेन-पोलंड सीमेवर पोचले असून त्यांनी येथे मोर्चेबांधणी केली आहे. त्याचसमवेत अमेरिका युक्रेनच्या सैन्याला पोलंडमध्ये घातक शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण देत आहे.