पितांबरीचे परीक्षित प्रभुदेसाई ‘युवा कोकण आयडॉल’ पुरस्काराने सन्मानित !

प्रवीण दरेकर यांच्याकडून पुरस्कार स्वीकारतांना परीक्षित प्रभुदेसाई, समवेत रवींद्र प्रभुदेसाई

ठाणे – ‘ग्लोबल कोकण’ या मान्यवर संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘युवा कोकण आयडॉल’ पुरस्कार पितांबरी प्रोडक्ट्स प्रा.लि.चे उपाध्यक्ष श्री. परीक्षित प्रभुदेसाई यांना प्रदान करण्यात आला. कोकणात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या २९ व्यक्तींचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. अशा पुरस्कारांचे हे पहिलेच वर्ष होते. ठाणे येथे पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. प्रवीण दरेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी मुंबई विद्यापिठाचे माजी प्र. कुलगुरु डॉ. अरुण सावंत, विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे, संस्थेचे प्रमुख कार्यवाहक संजय यादवराव, मुसळे उद्योगसमुहाचे समीर मुसळे, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, मॅक्स महाराष्ट्राचे प्रमुख रवींद्र आंबेडकर, महाराष्ट्र व्यापारी मित्रमंडळाचे अनंत भालेकर आणि पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.