अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे नमाजपठणाची वेळ होताच रंग खेळणार्‍यांवर दगडफेक

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना सण साजरे करणार्‍या हिंदूंवर दगडफेक करण्याचे धर्मांधांचे धाडस होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! अशांवर सरकारने कठोर कारवाई करावी ! – संपादक 

घटनास्थळ

अमरोहा (उत्तरप्रदेश) – येथे १८ मार्च या दिवशी धूलिवंदनाच्या वेळी ‘डिजे’वर (मोठ्या ध्वनीक्षेपक यंत्रणेवर) गाणी लावून रंग खेळत असतांना धर्मांधांनी त्यांच्यावर दगडफेक केली. नमाजपठणाची वेळ झालेली असतांना ‘डिजे’ लावण्यात आल्यामुळे धर्मांधांनी ही दगडफेक केली. पोलिसांनी ३ जणांना दगडफेक करतांना अटक केली, तर काही जण पळून गेले. पोलीस त्यांच्या हाती आलेल्या चित्रीकरणावरून पळून गेलेल्यांची ओळख पटवून त्यांचा शोध घेत आहेत. दगडफेकीत २ जण घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले.

या ठिकाणी हिंदूंचे मंदिर आणि धर्मशाळा आहे, तर काही अंतरावर मशीद आहे. दुपारी दीडच्या सुमारास नमाजपठणाची वेळ झाली होती. त्या वेळी डिजे लावून हिंदू रंग खेळत होते. तेव्हा मुसलमानांनी डिजे बंद करण्यास सांगितले; मात्र रंग खेळणार्‍या हिंदूंनी त्याला नकार दिला. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. नंतर धर्मांधांनी घराच्या छतावरून दगडफेक केली.