|
गौहत्ती (आसाम) – आसाममध्ये आताही अनेक आतंकवादी गट सक्रीय आहेत. या आतंकवादी गटांचा बीमोड करण्यासाठी राज्य पोलीस काम करत आहे, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी नुकतेच येथे सांगितले. आसाम पोलिसांनी भारतीय उपखंडातील अल् कायदाशी (‘पाया’ किंवा ‘आधार’) संलग्न असलेल्या बांगलादेशी जिहादी संघटनेशी संबंधित बांगलादेशी नागरिकासह ५ जणांना काही दिवासांपूर्वी अटक केली होती.
Assam chief minister Himanta Biswa Sarma has said that several jihadi terror modules are active in the state.#Assam #CM #Eastnews #jihad #Northeast #Terror pic.twitter.com/cv2mBCRprJ
— East News (@EastNewsin) March 7, 2022
मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले, ‘‘गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, आम्ही आसाममधील आतंकवादी कारवायांच्या विरोधात काम करण्यासाठी एक विशेष शाखा स्थापन केली होती. आसाम पोलिसांनी कह्यात घेतलेल्या आतंकवाद्यांच्या चौकशीच्या वेळी नवीन माहिती समोर आली आहे. या माहितीच्या आधारे आसाममध्ये निकटच्या काळात जिहादी आतंकवाद्यांपासून मोठा धोका निर्माण होऊ शकतो.’’
आसामचे पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंता यांनी सांगितले की, कह्यात घेतलेला बांगलादेशी नागरिक सैफुल्ल इस्लाम उपाख्य हारूण रशीद हा अवैधरित्या भारतात घुसला होता आणि ढकलियापारा मशिदीत शिक्षक म्हणून काम करत होता. (मदरशांचे खरे स्वरूप जाणा ! – संपादक)