
मथुरा (उत्तरप्रदेश) – महाशिवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने २६ आणि २७ फेब्रुवारी या दोन्ही दिवशी विविध ठिकाणी प्रवचने अन् ग्रंथप्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही उपक्रमांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
१. श्रीजी शिवाशा इस्टेट येथील मंदिरामध्ये प्रवचनाचे आयोजन
हिंदु जनजागृती समितीचे डॉ. भूपेश शर्मा यांनी येथील श्रीजी शिवाशा इस्टेटमधील मंदिरामध्ये शिवाच्या पूजनाविषयी प्रवचन घेतले. या वेळी त्यांनी शिवाच्या उपासनेमागील अध्यात्मशास्त्रीय महत्त्व, पूजन शास्त्रानुसार कसे करावे ? महाशिवरात्रीच्या दिवशी ‘ॐ नम: शिवाय’ नामजप करण्याचे लाभ आदींविषयी माहिती दिली. या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.
२. सालाबाद जिल्ह्यातील ताजपूर येथे प्रवचनाचे आयोजन
महाशिवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सालाबाद जिल्ह्यातील ताजपूर येथे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी समितीचे श्री. अरविंद गुप्ता यांनी शिवाच्या उपासनेमागील अध्यात्मशास्त्रीय महत्त्व आदींविषयी माहिती दिली, तसेच श्री कुलदेवतेचा नामजप का करावा ? ‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपाचे महत्त्व सांगितले. या प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
३. सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन
महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने एका ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या डॉ. टीना खेरा यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. या प्रवचनाचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
क्षणचित्र
सनातन संस्थेच्या वतीने शिवाशा इस्टेट कॉलनीतील शिवाशेस्वर महादेव मंदिर आणि गर्तेश्वर महादेव मंदिर या दोन ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एका प्रदर्शनावर एका जिज्ञासूने १२ मोठे ग्रंथ घेऊन अध्यात्माविषयी जिज्ञासा असल्याचे सांगितले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या ‘हिंदु एकता दिंडी’च्या संदर्भात साधकांना जाणवलेली सूत्रे !
क्रांतीदिनी हिंदु जनजागृती समितीने जुने गोवे येथील ‘हात कातरो खांबा’च्या ठिकाणी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली
१९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा ! – हिंदु जनजागृती समिती
यवतमाळ येथे ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषद’ पार पडली !
ठाणे येथे सीरवी समाजाच्या कार्यक्रमात ‘लव्ह जिहाद’विषयी जनजागृती