‘रशियाने त्यांचे सैनिक आणि रणगाडे वगैरे युक्रेनच्या आत पाठवले. रशियाला वाटले, ‘आपण गेली ८ वर्षे ‘हायब्रिड वॉर’ (एकही गोळी न चालवता युद्ध पुकारणे) लढत आहोत. त्यामुळे युक्रेन घाबरलेले आहे. जसे आमचे रणगाडे आग ओकत पुढे येतील, तसे ते पळून जातील’; पण तसे झालेले नाही. युक्रेनने त्यांना आत येऊ दिले आणि गनिमी कावा युद्धाच्या काही चांगल्या युक्त्या वापरल्या. या सैन्याच्या मागाहून अन्न-पाण्याची रसद (पुरवठा) घेऊन येणार्या सैन्यावर त्यांनी आक्रमण केले. त्यामुळे रशियाची अडचण झाली.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे